बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!

On: December 24, 2024 11:42 AM
murder
---Advertisement---

Suresh Dhas | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. रोज नवीन-नवीन खुलासे या प्रकरणी समोर येत आहे. यावरून आमदार धनंजय मुंडे यांना देखील सतत टार्गेट केलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मोक्काचे आदेश दिले आहेत. अशात आमदार सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी बीडच्या आकाबद्दल खुलासा केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार आहे. हे सर्व प्रकरण मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलंय”, असं आमदार धस म्हणाले.

काय म्हणाले सुरेश धस?

“हा रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं मनावर घेतलंय”, असंही पुढे बोलताना आमदार धस (Suresh Dhas ) म्हणाले.

यावेळी त्यांनी बीडमधील कायदा-सुव्यवस्थाबाबतही भाष्य केलं. “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे” असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला. “मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेता आहे. पोलीस, सीआयडी आरोपींच्या पाठीमागे आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे.”, अशी मागणी देखील आमदार धस यांनी केली.

“मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकमंत्री व्हावं”

यावेळी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतही धस यांनी भाष्य केलं. “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” असं सुरेश धस (Suresh Dhas ) म्हणाले. तसंच, हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही असंही पुढे धस म्हणाले.

News Title –  MLA Suresh Dhas on Santosh Deshmukh murder

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले

ट्रायने मोबाईल रिचार्ज संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!

गुड न्यूज! लाडक्या बहीणींनो आजपासून खात्यात जमा होणार पैसे, 1500 की 2100 मिळणार?

प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…

‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

Join WhatsApp Group

Join Now