वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी

On: January 13, 2025 4:11 PM
Santosh Deshmukh case
---Advertisement---

Walmik Karad l सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटत आहेत. कारण या हत्येमध्ये मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. अशातच या प्रकरणात दररोज नवनवीन दावे केले जात आहे. अशातच आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले? :

याप्रकरणी संदीप क्षीरसागर म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याशिवाय मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर कारवाई होणार नाही. कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहावर डील करण्यासाठी गेले होते. तसेच याठिकाणी नोटा मोजतानाचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत”, असा गौप्यस्फोट आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

“मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे. मात्र आता सगळ्या लोकांचे सीडीआर तपासल्यास ही गोष्टी लवकरच समोर येईल. मात्र वाल्मिक कराडवर हत्येचे कटकारस्थान रचल्याप्रकरणी 302 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल का केला जात नाही”, असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.

Walmik Karad l वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही :

दरम्यान, “सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा एक मारेकरी अद्यापही फरार आहे. कारण धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळेच हा विषय होत आहे. तसेच आता नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला पाहिजे आणि या प्रकरणाचा सीडीआरच्या आधारे तपास झाला पाहिजे” असं आमदार क्षीरसागर म्हणाले आहेत. .

याशिवाय “या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असतानाच आता वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता आणि आम्ही देखील शांत बसणार नाही”, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

News Title : mla sandeep kshirsagar on walmik karad

महत्वाच्या बातम्या –

जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, केल्या ‘या’ मोठ्या मागण्या?

आज नवपंचम योगामुळे ‘या’ राशींचे लोक यशस्वी होणार!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now