भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!

On: December 10, 2024 5:56 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

Maharashtra l राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. आमदार कारण प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मनीष निकोसे नावाच्या इसमाने प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र ही धमकी मिळाल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीविरोधात प्रसाद लाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

याशिवाय पोलिसांनी मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच मनीष निकोसे यांनी लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.

Maharashtra l दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेनं :

मिळालेल्या माहितीनुसार, दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेनं असं प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या मनीष निकोसे या व्यक्तीने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रसाद लाड यांना धमकी देणारा व्यक्ती कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करत आहे तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करत आहे. मात्र आता या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

News Title : MLA Prasad Lad Death threat

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिमंडळात कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी दिल उत्तर

असली उंदर पवारसाहेब… पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला ‘या’ नेत्याचं प्रत्युत्तर

100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; पडळकरांची पवारांवर एकेरी टीका

तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा

‘..हा तर क्षत्रियांचा अपमान’; पुष्पा-2 च्या निर्मात्यांना थेट धमकी, नेमकं झालं काय?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now