Mumbai l सध्या राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चत आहे. अशातच आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही थेट मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी सरकारला दिला आहे. आमदार किरण लहामटे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे सध्या दिसत असून मुंबईला जाणारे रस्ते थांबवणार, रेल्वेचे रूळ उखडून काढू असे इशारे देखील त्यांनी दिले आहेत.
किरण लहामटे नेमकं काय म्हणाले? :
अशातच आता आमदार किरण लहामटे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह असून राज्यात याचे काय पडसाद उमटतात याकडे लक्ष लागलं आहे. तसेच जर धनगरांसाठीचा जीआर काढला जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील आमदार व खासदार थेट आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका आमदार किरण लहामटे यांनी मांडली आहे.
आमदार किरण लहामटे पुढं म्हणाले की, आत्तापर्यंत आदिवासांनी प्रचंड त्याग केला आहे. त्यामुळे जर तुम्ही धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण दिल तर आम्ही थेट मुंबईचंच पाणी बंद करू, तसेच तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते देखील थांबवू आणि रेल्वेचे रूळ सुद्धा उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी दिला आहे.
Mumbai l किरण लहामटे यांनी केंद्र सरकारला ठणकावलं :
राज्यातील धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातील निर्णय हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशी थेट मागणी केली आहे त्यामुळे आता केंद्र सरकारने असं करू नये, ते पाऊल उचललं तर आम्ही देखील दाखवून देऊ असंही आमदार किरण लहामटे यांनी केंद्र सरकारला ठणकावलं आहे.
अशातच आता आमदार किरण लहामटे यांनी केंद्र सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title : MLA kiran lahamate aginst on dhanagr samaj reservation
महत्वाच्या बातम्या-
..तर असं झालं नाही तर भाजप, शिंदे गट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार?
घराबाहेर आल्यावर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…
नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार
बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे
मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट






