Ajit Pawar | विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. विधानसभेआधी राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते विधानसभेआधी पक्षांतर करताना दिसत आहेत. विशेषत: राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहे. अशात पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांचं (Ajit Pawar) टेंशन वाढवलं आहे. अजित पवारांचे शिलेदार पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी शरद पवार यांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्ताने मोठी बॅनरबाजी केली आहे. त्या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असं लिहिण्यात आलं आहे.
आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके(Atul Benke) पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत.
शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
Pune News | “मी घडाळ्यावर लढणार पण विचार शरद पवारांचे”
माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असं समजायचं कोणी कारण नाही. माझा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेशसुद्धा नाही. कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य होतं. जशी कौटुंबिक नात्याने पवार फॅमिली एक आहे. तसेच माझ्यासोबत त्यांचं नातं आहे. मी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा आहे, असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
गोरंपान दिसणं झालं सोपं, ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय आत्ताच ट्राय करा!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा
उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!






