Health News | अनेक लोक दारू पिताना त्यात कोला किंवा सोडा मिसळतात, विशेषतः व्हिस्की किंवा व्होडकामध्ये (Vodka) एनर्जी ड्रिंक्स मिसळून पिण्याची सवय अनेकांना असते. दारूचा कडवटपणा कमी करण्यासाठी असे केले जाते, पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. एका संशोधनातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दारूमध्ये इतर पेये मिसळण्याचे धोके
मद्यपान करणे हेच आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यातही अनेक जण दारूमध्ये कोला, सोडा किंवा एखादे एनर्जी ड्रिंक मिसळून पितात, जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. कोल्ड्रिंक्समध्ये कॅफिन, कॅलरीज (Calories) आणि साखर (Sugar) असे अनेक घटक असतात. हे घटक अल्कोहोलमध्ये (Alcohol) मिसळल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, दारूमध्ये सोडा (Soda) मिसळून घेतल्याने रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (Blood Alcohol Level) अंदाजे १८% वाढू शकते.
Health News | हृदयविकार, लठ्ठपणा आणि पचनक्रियेवर परिणाम
कोल्ड्रिंक्स (Cold Drinks) आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये (Energy Drinks) असलेले कॅफिन शरीरासाठी चांगले नसते. त्यातच जर दारूमध्ये (Alcohol) हे मिसळले तर दारू पिण्याचे व्यसन (Addiction) जडते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयरोगाच्या समस्या निर्माण होतात. जेव्हा तुम्ही हे एकत्र पिता, तेव्हा रक्तदाबात (Blood Pressure) चढ-उतार होतात आणि ‘हार्ट अटॅक’चा धोका वाढतो. कोल्ड्रिंक्समध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अल्कोहोलसोबत ते एकत्र केल्यास, कॅलरीजची संख्या आणखी वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेही रुग्णांसाठी हे विशेष हानिकारक आहे.
अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्स एकत्र केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ (Heartburn) आणि इतर समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच पचनासंबंधित त्रास होतो, त्यांनी दारूमध्ये कोल्ड्रिंक मिक्स करून घेणे टाळावे. विविध संस्थांनी केलेल्या संशोधनानुसार, दारूमध्ये सोडा (Soda) किंवा कोल्ड्रिंक मिक्स करून पिण्याची सवय महिलांना जास्त प्रमाणात असते, त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.






