रियालिटी शो की, सिंपथी शो…?, सुरजच्या विजयानंतर अभिनेत्रीची पोस्ट

On: October 7, 2024 12:40 PM
Suraj Chavan Movie
---Advertisement---

Suraj Chavan | बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन सूरज चव्हाण याने आपल्या नावावर केलाय. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केलीये. या विजयानंतर राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणींनी सूरज चव्हाणचं कौतुक आणि अभिनंदन केलंय. तर, काही जणांकडून सुरज चव्हाणच्या विजयावर नाराजी व्यक्त केली जातेय. (Suraj Chavan)

मिताली मयेकरची पोस्ट व्हायरल

बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्री मिताली मयेकर ही नाराज झाल्याची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील टाकली होती. अभिनेत्री मिताली मयेकरची इंस्टा स्टोरी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या इंस्टा स्टोरीचा संबंध बिग बॉस मराठी शोसोबत जोडला जातोय. तिची स्टोरी व्हायरल होताच तिने ती स्टोरी लगेच डिलिट केली.

“रिॲलिटी शो की सिंपथी शो”, अशा आशयाची पोस्ट मितालीने इंस्टा स्टोरीवर टाकली होती. ही इंस्टा स्टोरी व्हायरल होताच तिने काही वेळानंतर लगेच डिलिट केली. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं जातंय. (Suraj Chavan)

सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून काय मिळाले?

विजयी झाल्यानंतर सुरजने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मी मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार, ते आता खरं ठरलं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!” (Suraj Chavan)

दरम्यान, बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना.गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. जिंकलेल्या रक्कमेचे सुरज काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर त्याने मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार असल्याचं सुरज म्हणाला. (Suraj Chavan )

mitali mayekar post

News Title : Mitali Mayekar Post on Suraj Chavan 

महत्वाच्या बातम्या –

अजितदादांचा नवा डाव! बारामतीतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार

“मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, तेव्हा..”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा?

“शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं काॅन्व्हेन्टमध्ये..”; किरण माने यांची पोस्ट चर्चेत

शिंदे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Join WhatsApp Group

Join Now