बदलापूर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द?, बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर; मंत्री अदिती तटकरे आक्रमक

On: August 20, 2024 6:25 PM
---Advertisement---

Badlapur Crime | बदलापुरातील आदर्श विद्यालयातील दोन लहान मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण आहे.

संतप्त नागरिकांचे रेल्वे रोको करत गेल्या 8 तासांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलकांकडून आरोपीच्या फाशीची मागणी केली जात आहे. अशात या प्रकरणी बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय.

बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर

बदलापूर येथील धक्कादायक प्रकरणावर महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल हक्क संरक्षण आयोगाचाही अहवाल मागवून दोषींवर कडक कारवाईसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सदर शाळेची मान्यताही रद्द करावी, अशी मागणी आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे करत आहोत, असं तटकरेंनी सांगितलं.

ही घटना निदंनीय आणि दुर्दैवी आहे. जिल्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरेंनी दिली.

Badlapur Crime प्रकरणी अदिती तटकरे आक्रमक

शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना शाळांमध्ये घडणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गृहविभागाकडे आम्ही करणार आहोत, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

दरम्यान, पालक आपल्या मुलांना त्या-त्या संस्थेतील लोकांच्या विश्वासावर शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जर शाळेतच घडत असेल तर पालकांना धक्का बसणं सहाजिक आहे. त्यामुळे भितीचं वातावरण पालकांमध्ये निर्माण झाल्याचंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना, म्हणाले… ‘आरोपीला…’

केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण

वरुण ‘यू लव्ह आय’; पण मला मुली आवडत नाहीत?

बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now