‘हिटमॅन’ची जादू! २६ रन्समध्येही रोहित शर्माने केला IPL मध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड

On: April 18, 2025 7:45 AM
MI vs SRH Rohit Sharma
---Advertisement---

MI vs SRH | आयपीएल २०२५ मध्ये सध्या फॉर्मसाठी झगडत असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वानखेडे स्टेडियमवर एक अनोखा इतिहास घडवला आहे. जरी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला, तरी त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. (MI vs SRH)

सर्वाधिक षटकारांचा विक्रम

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना रोहितने १६ चेंडूत २६ धावा केल्या. हा डाव फारसा मोठा नसला तरी त्यातच त्याने वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला. तो आयपीएलच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमवर १०० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

या ऐतिहासिक मैदानावर कोणीही याआधी एवढ्या षटकारांचा आकडा गाठलेला नव्हता. त्यामुळे रोहित शर्माने केलेला रेकॉर्ड आता चर्चेत आला आहे. रोहितच्या नावावर सध्या १०२ षटकार वानखेडेवर जमा झाले आहेत.

तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) – जो सध्या मुंबई इंडियन्सचा (MI) फलंदाजी प्रशिक्षक आहे. पोलार्डने वानखेडेवर एकूण ८५ षटकार लगावले आहेत.

वानखेडेवरील सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ फलंदाज:

  1. रोहित शर्मा – 102 षटकार
  2. किरॉन पोलार्ड – 85 षटकार
  3. सूर्यकुमार यादव – 48 षटकार
  4. अंबाती रायुडू – 43 षटकार
  5. जोस बटलर – 41 षटकार

Title : MI vs SRH Rohit Sharmas Wankhede Sixes Record in IPL

 

Join WhatsApp Group

Join Now