Rohit Sharma l वानखेडे स्टेडियमवर झालेल्या MI vs RCB सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai indians)12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या फलंदाजांनी झुंज दिली, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवानंतर चाहत्यांनी आणि विश्लेषकांनी मुंबईच्या (Mumbai indians) पराभवाचे कारण ठरवले ते माजी कर्णधार रोहित शर्माला.
आरसीबीने (RCB) प्रथम फलंदाजी करत 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 222 धावांचे आव्हान होते. पण डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma)पुन्हा एकदा निराशा केली. त्याने फक्त 9 चेंडूत 17 धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरला.
सलग अपयशामुळे रोहित शर्मा टीकेच्या धनी :
रोहित शर्माने (Rohit Sharma)आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून, एकाही सामन्यात त्याचा स्कोअर 20 धावांच्या वर गेला नाही.
CSK विरुद्ध – 0 धावा (4 चेंडू)
GT विरुद्ध – 8 धावा (4 चेंडू)
KKR विरुद्ध – 13 धावा (12 चेंडू)
RCB विरुद्ध – 17 धावा (9 चेंडू)
या आकड्यांवरून रोहितच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. संघासाठी स्थिर आणि आक्रमक सुरुवात देणाऱ्या फलंदाजाच्या भूमिका त्याच्याकडून अपेक्षित होत्या, परंतु त्याच्या अपयशामुळे संघावर प्रारंभीच दडपण येत आहे.
Rohit Sharma l विजयासाठी गरज होती मोठ्या खेळीची :
RCBने दिलेलं 222 धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी मुंबईला सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजीची गरज होती. पण रोहित शर्माचा लवकर परत जाणं संघासाठी नुकसानदायक ठरलं. रायन रिकेल्टन आणि तिलक वर्मा यांनी नंतर प्रयत्न केले, परंतु प्रारंभी गमावलेला वेळ आणि विकेट्स याचा फटका बसत राहिला. (Mumbai indians)
एका सामन्यात विश्रांती दिल्यानंतर रोहित शर्मा संघात पुनरागमन करताना मोठी खेळी साकारेल अशी अपेक्षा होती. पण त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा साधारण ठरलं. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संघ व्यवस्थापनाला आता पुढील सामन्यांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






