मुंबई इंडियन्स नक्कीच सामना जिंकली असती, मात्र… खेळ कसा उलटला?

On: April 8, 2025 2:23 PM
MI vs RCB
---Advertisement---

MI vs RCB | आयपीएल 2025 मध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या रोमांचक सामन्यात एका क्षणाने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. हार्दिक पांड्याच्या विकेटने RCBला विजयाकडे वळवलं, अन्यथा मुंबई इंडियन्स सहज विजयाच्या उंबरठ्यावर होती.

RCBने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 221 धावा केल्या. विराट कोहली आणि रजत पाटीदारने शानदार अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेतलं. मात्र, एक ‘क्षण’ असा आला ज्याने संपूर्ण सामन्याचा कल बदलून टाकला. (MI vs RCB)

हार्दिक पांड्याच्या विकेटने पलटलं चित्र :

तिलक वर्माने 29 चेंडूत 56 धावा, तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 42 धावा (3 चौकार, 4 षटकार) ठोकले. शेवटच्या 2 षटकात मुंबईला 28 धावांची गरज होती आणि चाहत्यांना विजय निश्चित वाटत होता. पण जोष हेझलवूडच्या 19व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिक बाद झाला, आणि सामना RCBच्या पारड्यात झुकला.

शेवटचं षटक कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) फिरकीपटू कृणाल पांड्याकडे सोपवलं. कृणालनेही जबरदस्त प्रदर्शन करत पहिल्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या – सँटरनर आणि दीपक चहरला बाद करत सामन्यावर शिक्कामोर्तब केलं. याच षटकात नमन धीरलाही बाद करत एकूण 3 बळी घेतले आणि RCBला 12 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

10 वर्षांनी वानखेडेवर आरसीबीचा विजय :

या विजयासह RCBने 10 वर्षांनंतर वानखेडेवर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत केलं आहे. यापूर्वी 2015 मध्ये RCBने मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता. या सामन्यात आरसीबीकडून कृणाल पांड्या (4 विकेट्स), जोश हेझलवूड आणि यश दयाल (2-2 विकेट्स) यांनी गोलंदाजीत कमाल केली.

दरम्यान, हार्दिक पांड्याची विकेटच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्याच्या शॉट्समुळे सामना पूर्णपणे मुंबईकडे झुकला होता. पण जोश हेझलवूडच्या अचूक यॉर्करमुळे हार्दिक तंबूत परतला आणि तिथूनच RCBने पुन्हा सामन्यात पकड मिळवली.

News Title: MI vs RCB: Hardik Pandya’s Wicket Changed the Game – Bengaluru Seals 12-Run Victory at Wankhede

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now