मुंबईची पलटण गुजरातला लोळवत हिशोब बरोबर करणार?

On: May 6, 2025 11:25 AM
Mumbai Indians
---Advertisement---

IPL 2025 l आयपीएल 2025 च्या 55 व्या सामन्यात मंगळवारी (5 मे) मुंबई इंडियन्सचा (MI) संघ गुजरात टायटन्सविरुद्ध (GT) वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहे. हा सामना मुंबईसाठी केवळ प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर मागील पराभवाची परतफेड करण्याची संधीही आहे.

गेल्या 29 मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यात मुंबईला ‘जवाब’ देण्याची नामी संधी आहे. IPL 2025 मध्ये मुंबईचा हा 11 वा सामना असून आतापर्यंत त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबईने मोसमाची सुरुवात खराब केली होती, परंतु जसप्रीत बुमराहच्या (Bumrah) पुनरागमनानंतर आणि रोहित शर्माच्या फॉर्ममुळे संघाने जबरदस्त पुनरागमन केलं आहे.

सलग सहा विजयांची मालिका मुंबईच्या नावावर :

मुंबईने मागील सहा सामने सलग जिंकले आहेत. यात दिल्ली, सनरायजर्स हैदराबाद (दोनदा), चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध मिळवलेले विजय आहेत. पहिल्या काही सामन्यांत संघर्ष करणाऱ्या मुंबईने आता पुन्हा फॉर्म पकडला आहे आणि त्यांचा आत्मविश्वास चरमसीमेवर आहे.

गुजरात टायटन्ससुद्धा (GT) 10 पैकी 7 सामने जिंकत प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मात्र, मुंबईच्या तुलनेत त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा गुजरातविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. यासाठी त्यांनी सामन्याआधी खास सराव सत्र घेतलं आहे.

IPL 2025 l सध्याचं गुणतालिका स्थान :

मुंबई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट +1.274 आहे. गुजरातचा संघ चौथ्या स्थानी आहे आणि त्यांचा नेट रन रेट +0.867 आहे. दोघांच्याही खात्यात 14 गुण आहेत, त्यामुळे हा सामना दोघांसाठीही महत्त्वाचा आहे.

या सामन्याचा निकाल प्लेऑफच्या समीकरणावर मोठा प्रभाव टाकणार आहे. मुंबई सातवा विजय मिळवून प्लेऑफकडे एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरातची रणनीती मुंबईची विजयी घोडदौड रोखण्याची असेल.

News Title: MI vs GT: Mumbai Eyes 7th Straight Win Against Gujarat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now