MHADA Mumbai Flats | मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, सध्याच्या गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती पाहता सर्वसामान्यांसाठी हे स्वप्न पूर्ण करणं कठीण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडा (MHADA) परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी लॉटरी काढत असते. परंतु, यावर्षी म्हाडाकडून एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. (MHADA Mumbai Flats)
मुंबईतील काही मोक्याच्या ठिकाणी असलेली म्हाडाची घरे सलग दोनदा लॉटरी काढूनही विकली गेली नाहीत. नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने ही घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे आता म्हाडाने ही घरे थेट विक्रीसाठी (Open to All) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
ताडदेव परिसरातील आलिशान घरांकडे पाठ फिरवली :
ताडदेव परिसरातील म्हाडाची आलिशान घरे विक्रीविना पडून आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत ६ ते ७ कोटी रुपयांच्या घरात आहे. लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी काढल्यानंतरही या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. (MHADA Rent Plan)
यामुळे म्हाडाकडून आता ‘ओपन टू ऑल’ पद्धतीने ही घरे सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापूर्वी ही घरे ठराविक प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, विक्री न झाल्याने ती सर्वांसाठी खुली केली जाणार आहेत. ग्राहकांना याच किमतीत थेट खरेदी करता येणार आहे.
MHADA Mumbai Flats | विक्री न झाल्यास घरं भाड्याने देण्याचा पर्याय :
म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर थेट विक्रीच्या माध्यमातूनही ही घरे विकली गेली नाहीत, तर ती भाड्याने देण्याचा विचार सुरू आहे. अशा प्रकारे म्हाडा आपली अडकलेली मालमत्ता उपयोगात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
ताडदेवसारख्या प्रीमियम लोकेशनमध्ये असलेल्या या घरांना बाजारातील दराशी तुलना करता किंमती अधिक असल्याने खरेदीदार कमी मिळत आहेत. त्यामुळे म्हाडाकडून आता व्यावहारिक भूमिका घेत या घरांचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (MHADA Mumbai Flats)
अधिकृत घोषणा अद्याप बाकी :
सदर घरे थेट विक्री आणि भाड्याने (MHADA Rent Plan) देण्याबाबत अद्याप म्हाडाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अधिक माहितीसाठी म्हाडाची अधिकृत वेबसाईट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतील गृहनिर्माण बाजारपेठेत म्हाडाच्या या नव्या निर्णयामुळे एक नवा ट्रेंड दिसू शकतो, कारण यामुळे अनेकांना लॉटरीशिवाय मुंबईत घर खरेदी किंवा भाड्याने घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.






