मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी निघणार म्हाडाच्या घरांची लॉटरी

On: January 26, 2025 12:59 PM
MHADA Lottery kokan mandal on 5th february
---Advertisement---

MHADA Lottery | म्हाडाच्या (MHADA Lottery) कोकण मंडळाकडून (Kokan Mandal) विक्रीस काढण्यात आलेल्या २,१४७ घरे आणि ११० भूखंडांसाठीची लॉटरी (Lottery) ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत ठाणे (Thane) येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी एक वाजता ही सोडत होणार आहे.

या लॉटरीसाठी तब्बल २४,९११ अर्ज अनामत रकमेसह (EMD) प्राप्त झाले आहेत. लॉटरीचा निकाल त्याच दिवशी अर्जदारांना त्वरित मोबाईलवर एसएमएसद्वारे (SMS), ई-मेलद्वारे (E-mail) तसेच ॲपवर (App) प्राप्त होईल, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर (Revati Gaykar) यांनी दिली.

लॉटरीत २,१४७ घरे आणि ११० भूखंड

कोकण मंडळातर्फे या लॉटरीमध्ये २,१४७ घरे आणि ११० भूखंडांचा समावेश आहे. या घरांसाठी आणि भूखंडांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. त्यामुळे ही लॉटरी अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

निकाल तत्काळ मिळणार

लॉटरीचा निकाल त्याच दिवशी, तत्काळ जाहीर होणार असल्याने अर्जदारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे आणि ॲपवर एकाच वेळी प्राप्त होणार असल्याने अर्जदारांची सोय होणार आहे. (MHADA Lottery)

Title: MHADA Lottery kokan mandal on 5th february

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now