MHADA Lottery | मुंबईसारख्या महानगरात घर घेणे सर्वसामान्यांसाठी अजूनही स्वप्नवत मानले जाते. कारण येथे 400 चौरस फुटांच्या घरांचा भाव तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत म्हाडा (MHADA) सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देते आणि त्यांची लॉटरी ही नागरिकांसाठी आशेचा किरण असते. मात्र, आतापर्यंत म्हाडाकडून मिळालेल्या घरांना ताबा मिळाल्यानंतर पाच वर्षे विकता येत नसे. आता ही अट शिथिल करण्याची शक्यता आहे. (MHADA Lottery 2025)
नवीन प्रस्ताव :
म्हाडाच्या अटींनुसार, विजेत्याला घर मिळाल्यानंतर पुढील ५ वर्षे ते विकता येत नाही. परंतु, ही अट रद्द करण्याचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास घर विजेत्याला ताबा मिळाल्यानंतर लगेचच ते विकण्याची मुभा मिळू शकते. (MHADA Lottery Homes Rule Change)
जर ही अट रद्द झाली, तर म्हाडाच्या योजनेतून मिळालेली घरे बाजारभावापेक्षा २० ते ३० लाखांनी स्वस्त मिळतात. त्यामुळे ताबा मिळताच घर विकल्यास संबंधित मालकाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांना आर्थिक फायदा होईल.
MHADA Lottery | टीकेचे सूर :
तथापि, या निर्णयामुळे म्हाडाच्या मूळ उद्दिष्टावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. म्हाडाचे उद्दिष्ट म्हणजे गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे. मात्र, जर घरमालकांना लगेच घर विकण्याची परवानगी मिळाली, तर श्रीमंत लॉबी ही घरे स्वस्तात घेऊन जास्त किंमतीत विकण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळे गरीब आणि खऱ्या अर्थाने गरजू नागरिकांना घर मिळणे कठीण होऊ शकते. (MHADA Lottery Homes Rule Change)
या निर्णयामुळे बाजारात घरांची मागणी आणि किंमतीत चढ-उतार होऊ शकतात. म्हाडाच्या योजनांचा फायदा घेणारे लोक गुंतवणूकदार म्हणून उदयाला येऊ शकतात. परिणामी, सर्वसामान्य घरखरेदीदार पुन्हा एकदा घरांच्या शर्यतीत मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.






