MHADA Lottery 2025 | म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या घरांच्या आणि भूखंडांच्या सोडतीसाठी अर्जदारांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. मंडळाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत 11 ऑक्टोबर 2025 रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 5,354 घरं आणि 77 भूखंडांचे भाग्यवान मालक कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. (MHADA Lottery 2025)
सोडतीचे ठिकाण आणि तारीख :
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संगणकीय सोडत 11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल. अर्जदारांच्या अनामत रकमेसह नोंदवलेल्या अर्जांची सोडत जाहीर झाल्यानंतर विजेत्यांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील.
प्रारूप यादी (Draft List): 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 6.00 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध
दावे व हरकती: 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदविता येतील
अंतिम यादी (Final List): 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 6.00 वाजता प्रसिद्ध
सोडत (Lottery Draw): 11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथे होणार आहे.
MHADA Lottery 2025 | घरांची विभागणी :
या सोडतीत विविध गृहनिर्माण योजनांखाली उपलब्ध घरांची विभागणी करण्यात आली आहे :
20% सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका
15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3002 सदनिका
म्हाडा कोकण मंडळ (विखुरलेल्या सदनिका) – 1746 सदनिका
म्हाडा कोकण मंडळ (50% परवडणाऱ्या सदनिका) – 41 सदनिका
याशिवाय, सिंधुदुर्ग (ओरोस) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड (MHADA Lottery 2025)
अर्जांची प्रचंड संख्या :
या सोडतीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. मंडळाला एकूण 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,58,424 अर्ज अनामत रकमेसह वैध ठरले आहेत. या आकड्यामुळे अर्जदारांमध्ये उत्साह आणि स्पर्धा दोन्ही वाढली आहेत.
11 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत झाल्यानंतर, विजेत्या अर्जदारांची यादी आणि प्रतीक्षा यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in उपलब्ध होईल. त्यामुळे अर्जदारांनी सोडतीनंतर थेट संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहावा.






