म्हाडाचं घर खरेदीची सुवर्णसंधी! लॉटरीशिवाय मिळणार हक्काचं घर

On: August 28, 2025 11:45 AM
MHADA Lottery 2025
---Advertisement---

MHADA | मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, आकाशाला भिडलेल्या घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांना हे स्वप्न साकार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाकडून (MHADA) परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. साधारणतः ही घरे संगणकीय सोडतीद्वारे (लॉटरी) वाटप केली जातात. पण यावेळी खास बाब म्हणजे काही घरे लॉटरीशिवाय विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. (MHADA Flats Without Lottery)

ताडदेव परिसरातील घरे थेट विक्रीसाठी :

मुंबईतील ताडदेव परिसरातील म्हाडाची आठ घरे लॉटरी निघूनही विकली गेली नाहीत. या घरांच्या किंमती जास्त असल्यामुळे नागरिकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, म्हाडाला या घरांचे मेंटेनन्ससाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आता म्हाडा ही घरे थेट विक्री करण्याच्या विचारात आहे.

ही घरे बिल्डरकडून प्रीमियम स्वरूपात म्हाडाला मिळाली होती. राज्याच्या गृहनिर्माण धोरणानुसार मोठ्या गृहप्रकल्पांमधून बिल्डरने म्हाडाला काही घरांचा वाटा द्यायचा असतो. त्यातूनच ही ताडदेवमधील घरे म्हाडाच्या ताब्यात आली. (MHADA Flats Without Lottery)

MHADA | प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विक्री :

मिळालेल्या माहितीनुसार, या घरांची विक्री “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर केली जाणार आहे. इच्छुक नागरिकांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासंदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप म्हाडाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

म्हाडाकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे की, घरांची विक्री केवळ संगणकीय सोडतीद्वारेच केली जाते. या प्रक्रियेत कोणत्याही एजंट, सल्लागार किंवा प्रतिनिधीचा सहभाग नसतो. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही व्यक्तीशी थेट व्यवहार करू नये, अन्यथा फसवणुकीस ते स्वतः जबाबदार असतील, असेही म्हाडाने कडक शब्दांत सांगितले आहे. (MHADA Flats Without Lottery)

म्हणूनच लॉटरीशिवाय घर विक्रीच्या बातम्या समोर आल्या असल्या तरी जोपर्यंत म्हाडाकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही लिंकवर क्लिक करून अर्ज दाखल करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: MHADA Flats Without Lottery: Golden Chance to Buy Homes Directly in Mumbai’s Tardeo Area

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now