CM Rekha Gupta | भाजपच्या (BJP) रेखा गुप्ता (CM Rekha Gupta ) यांनी शालीमार बाग (Shalimar Bagh) मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दिल्लीच्या (Delhi) नव्या मुख्यमंत्रीपदी गुरुवारी शपथ घेतली. २०२५ दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.
हेमा, रेखा, जया आणि सुषमा-
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नियुक्तीच्या बातमीने सोशल मीडियावर वेगळाच रंग घेतला. एका वापरकर्त्याने सुप्रसिद्ध जाहिरात जिंगल – “हेमा, रेखा, जया आणि सुषमा, सगळ्यांची पसंती निर्मा” याला भाजप आणि त्याच्या महिला नेत्यांशी जोडत एक नवा ट्विस्ट दिला. तोच जिंगल बदलून “हेमा, रेखा, जया आणि सुषमा, सगळ्यांची पसंती भाजप” असा केला गेला. या मीमने वेगाने लोकप्रियता मिळवली आणि अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
काहींनी या क्रिएटिव्ह मीमचे कौतुक केले, तर काहींनी भाजपच्या निर्णयावर टीका केली. काहींनी तो “एकतेचे आणि शक्तीचे प्रतीक” असल्याचे म्हटले.
रेखा गुप्ता यांचे जुने ट्विट्स वादाच्या भोवऱ्यात-
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर काही वेळातच रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या जुन्या ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला तोंड फुटले. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या काही जुन्या पोस्ट्स आणि ट्विट्स ‘डार्क ह्युमर’ असल्याचे सांगत राजकीय विरोधकांवर त्यांनी पूर्वी केलेल्या टीकांची चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर यूट्यूबर समय रैना (Samay Raina), रणवीर अल्लाहबादिया (Ranveer Allahbadia) आणि अपूर्वा मुखिजा (Apoorva Mukhija) उर्फ ‘द रिबेल किड’ (The Rebel Kid) यांचा समावेश असलेल्या एका मीमने विशेष लक्ष वेधले. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ (India’s Got Latent) वादानंतरही या तिघांनी रेखा गुप्ता यांचे ट्विट्स पाहून त्यांना सलाम केल्याचे दाखवण्यात आले.
एका युजरने त्यांच्या ट्विट्सना ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ वादात पाहिलेल्या विनोदांपेक्षा अधिक टोकाचे आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले. दुसरीकडे काहींनी रेखा गुप्ता यांच्यावरील मीम्स आणि ट्रोलिंग थांबवण्याची मागणी केली. एका युजरने दिल्ली पोलिसांना टॅग करून गुप्ता यांच्याविषयी आक्षेपार्ह सामग्री पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपचा मोठा विजय, रेखा गुप्तांचा निर्णायक मताधिक्याने विजय
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी शालीमार बाग (Shalimar Bagh) मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या (AAP) उमेदवार बंदना कुमारी (Bandana Kumari) यांचा तब्बल २९,००० मतांनी पराभव करत विजय मिळवला. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर आम आदमी पार्टी केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले.






