लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?

On: September 29, 2024 3:58 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत. याबाबत सरकारने अधिकृतपणे माहिती दिली आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर तिसऱ्या टप्प्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र भगिनींना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता, त्यांना तीसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत, असं आदिती कटकरे यांनी सांगितलं.

लाकडी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहिना 1500 रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. मात्र कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत.

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाहीये, त्यांच्यादेखील बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळेच अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.

ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने एकदाच दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत. मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे, अशा महिलांना तीन हप्त्याचे एकूण 4500 रुपये दिले जातील.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो

‘…तर मी सरकारमधून बाहेर पडेन’; ‘या’ बड्या नेत्याची धमकी

शरद पवारांनी सांगितली रणनीती, उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

पवारांच्या तुतारीला पिपाणीमुळे फटका, चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now