“माझ्या दिराने मला अवघड जागी…”, मयुरी हगवणेच्या खुलाशाने खळबळ!

On: May 27, 2025 7:07 PM
mayuri hagawane
---Advertisement---

Mayuri Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने या कुटुंबाचा तथाकथित ‘माज’ आणि त्यामागे लपलेली क्रूरता आता चव्हाट्यावर आणली आहे. एका मुलीचा जीव गेला, दुसऱ्या सुनेने अत्याचाराची कहाणी सांगितली, तरीही या कुटुंबाची अरेरावी आणि दादागिरी कमी झाली नव्हती. पण आता कायद्याचा फास आवळला जात आहे आणि या माजामागचे एक-एक चेहरे उघडे पडत आहेत.

नक्की काय घडलं?

वैष्णवीची मोठी जाऊ, मयुरी (Mayuri Hagawane), हिच्या आई आणि भावाने तब्बल सहा महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या एका पत्रातून स्पष्ट होते. हे पत्र म्हणजे हगवणे कुटुंबाच्या धमक्या, मागण्या आणि अत्याचाराचा एक धक्कादायक दस्तावेज आहे. २० मे २०२२ रोजी मयुरीचा सुशील हगवणे याच्याशी विवाह झाला. आणि लग्नानंतर काही काळातच, सासरे राजेंद्र हगवणे आणि सासू लता हगवणे यांनी आपली खरी रूपं दाखवायला सुरुवात केली. त्यांनी थेट फॉर्च्युनर गाडी आणि मोठ्या रोख रकमेची मागणी करत मयुरीला त्रास द्यायला सुरुवात केली.

सुशील घरी नसताना मारहाण –

मयुरीचा (Mayuri Hagawane) पती सुशील याच्यावर तिला सोडण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. पण सुशीलने नकार दिल्याने, त्यांचा सगळा राग मयुरीवर निघू लागला. आणि हा राग इतका विकोपाला गेला की, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी, सुशील घरी नसताना, सासू, सासरे, दीर शशांक आणि नणंद करिश्मा यांनी मिळून मयुरीला अमानुष मारहाण केली. तिचे कपडे फाडले.

स्त्रीच्या आत्मसन्मानाला पायदळी तुडवण्याचा प्रकार-

सासरे राजेंद्र हगवणे यांनी तिच्या छातीला हात लावल्याचा आणि दीर शशांकने तिच्या अवघड जागी लाथ मारल्याचा अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद आरोप या पत्रात करण्यात आला आहे. ‘तुला मुलगा होत नाही तर आमच्या कडे ये’ अशा घाणेरड्या भाषेत तिला शिवीगाळ करण्यात आली. हा केवळ शारीरिक छळ नव्हता, तर एका स्त्रीच्या आत्मसन्मानाला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार होता. जेव्हा मयुरीने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शशांकने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न त्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेचे दर्शन घडवतो.

News Title – Mayuri Hagawane reveals about shashank hagawane

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now