KDMC, ठाणे व उल्हासनगरमध्ये कोणाचा होणार महापौर? आरक्षण जाहीर

On: January 22, 2026 12:43 PM
Mayor Reservation Announced
---Advertisement---

Mayor Reservation Announced | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर बहुप्रतीक्षित महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये नेतृत्व कोणत्या प्रवर्गाकडे जाणार, हे स्पष्ट झाले असून स्थानिक राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे. (Mayor Reservation Announced)

या सोडतीनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (Kalyan-Dombivli Mahapalika) महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष असलेल्या KDMC मध्ये आता पक्षांकडून ST प्रवर्गातील उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. येथे शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली असून, मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (KDMC mayor ST)

ठाणे आणि उल्हासनगरमधील आरक्षण चित्र :

ठाणे महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे ठाण्यातील निवडून आलेल्या SC प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये महापौरपदासाठी चुरस सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 131 पैकी 71 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असून, चार जागांवर आघाडी असल्याने हा आकडा 75 पर्यंत पोहोचला आहे.

उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता प्रत्यक्ष महापौरपदाच्या शर्यतीला सुरुवात होणार असून, संबंधित प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये लॉबिंग आणि राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Ulhasnagar OBC mayor)

Mayor Reservation Announced | महापौरपदासाठी राजकीय समीकरणे बदलणार :

महापौरपदाच्या आरक्षणामुळे ठाणे, KDMC आणि उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी नव्या रणनीती आखल्या जात आहेत. (Mayor Reservation Announced)

विशेषतः युती आणि पाठिंब्याच्या राजकारणात बदल होण्याची चिन्हे असून, येत्या काही दिवसांत महापौरपदासाठी चुरशीच्या हालचाली पाहायला मिळणार आहेत.

News Title: Mayor Reservation Announced: SC in Thane, ST in KDMC, OBC in Ulhasnagar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now