Government Forecasts | जपानमध्ये जुलै (Japan) २०२५ मध्ये एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही भविष्यवाणी कोणत्याही भविष्यवेत्त्याने नव्हे, तर खुद्द जपान सरकारने केली आहे.
जपान सरकारची भविष्यवाणी
जपान सरकारला असा अंदाज आहे की, जुलै २०२५ मध्ये जपानमध्ये एक महाप्रलयंकारी त्सुनामी येऊ शकते आणि यात सुमारे ३ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जपान सरकारने आपल्या नागरिकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
तज्ज्ञांच्या मतानुसार, जपानच्या समुद्रात एक शक्तिशाली भूकंप येऊ शकतो, ज्याची तीव्रता ९.० किंवा त्याहून अधिक असू शकते. या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठी त्सुनामी लाट निर्माण होण्याची शक्यता आहे, जी जपानच्या किनारी भागांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते.
जपानमधील टोकोहोकू, शिझुओका, ओसाका आणि टोकियो यांसारख्या अनेक किनारी प्रदेशांना उच्च धोका क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सरकारने या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आणि धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
सरकारने व्यक्त केली भिती
यापूर्वीही जपानने अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. मार्च २०११ मध्ये जपानमध्ये एक मोठा भूकंप आला होता आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीने देशाला मोठा तडाखा दिला होता. त्या त्सुनामीमध्ये १९ हजार ७५९ लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारो लोक जखमी झाले होते. या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते आणि किमान दोन अणुऊर्जा प्रकल्पांमधून किरणोत्सर्गी धोका निर्माण झाला होता. त्यामुळे, आता जपान सरकारने केलेली ही भविष्यवाणी नागरिक अत्यंत गांभीर्याने घेत आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करत आहेत. जपान सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळता येईल.
News Title: Massive Disaster in ‘This’ Country in July 2025! 3 Lakh Deaths Expected? Government Forecasts






