चेहऱ्यावरील काळे डाग, वांग घालवण्यासाठी मसूर डाळीचा ‘हा’ उपाय ठरेल रामबाण!

On: January 27, 2025 11:19 AM
Skin Care
---Advertisement---

Skin Care l सुंदर, नितळ त्वचा (Fair Skin) हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. मात्र, वाढते प्रदूषण (Pollution), सौंदर्य प्रसाधनांमधील (Cosmetics) रसायनांचा (Chemicals) अतिवापर आणि काही अंशी अनुवांशिक (Hereditary) कारणांमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्याही चेहऱ्यावर काळे डाग (Dark Spots), वांग (Pigmentation) किंवा मुरूम (Pimples) असतील आणि त्यावर तुम्हाला नैसर्गिक उपचार (Natural Treatment) करायचे असतील, तर मसूर डाळीच्या पीठाचा फेसपॅक (Face Pack) तुमच्यासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी ठरणार नाही.

मसूर डाळीमध्ये (Red Lentils) विविध पोषक तत्वांसह व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स (Vitamin B Complex) असते. मसूर डाळीचे पीठ थोडेसे खरखरीत असते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पीठाचा वापर नैसर्गिक स्क्रबर (Natural Scrubber) म्हणून केला जातो. जेव्हा मसूर डाळीचे पीठ चेहऱ्यावर लावले जाते, तेव्हा ते त्वचेच्या छिद्रांमध्ये (Pores) जाऊन आतील घाण आणि त्वचेचा तेलकटपणा (Oiliness) दूर करते. याशिवाय मसूर डाळीचे पीठ लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. मसूर डाळीसोबत काही विशिष्ट पदार्थ मिसळून लावल्यास त्वचाविकार (Skin Problems) दूर होऊन त्वचेचे सौंदर्य खुलण्यास मदत होते.

मसूर डाळ आणि कच्च्या दुधाची पेस्ट :

तुम्ही मसूर डाळीचे पीठ आणि कच्च्या दुधाची (Raw Milk) पेस्ट बनवून ती काळे डाग किंवा वांगांवर लावू शकता. यासाठी मसूर डाळ बारीक करून त्यात थोडे कच्चे दूध टाका. तुम्ही त्यात १ चमचा मध (Honey) देखील घालू शकता. साधारणपणे २० मिनिटे ही पेस्ट काळ्या डागांवर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल.

मसूर डाळ आणि कोरफड जेल :

मसूर डाळ आणि कोरफडीची (Aloe Vera) पेस्ट त्वचेला हायड्रेट (Hydrate) करते, ज्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला कोरफडीचे जेल (Aloe Vera Gel) लागेल. तुम्ही ते विकत आणू शकता किंवा तुमच्याकडे कोरफडीचे रोप असेल तर त्यातूनही ताजे जेल काढू शकता. मसूर डाळ वाटून ती कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज (Massage) करा. १० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून ३ वेळा असे केल्याने काळ्या डागांची समस्या दूर होऊ शकते.

मसूर डाळ आणि बदामाचे तेल :

जर तुमच्या चेहऱ्यावर खूप डाग असतील तर नियमितपणे मसूर डाळीचे पीठ आणि बदामाच्या तेलाची (Almond Oil) पेस्ट लावा. रात्रभर मसूर डाळ पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये वाटून त्याचे बारीक पीठ करून घ्या. बदामाच्या तेलात हे पीठ एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा, जेणेकरून काळ्या डागांची समस्या कमी होईल.

News Title: masoor-dal-face-pack-benefits-for-dark-spots-and-pigmentation

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now