मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही? या दाव्याने खळबळ

On: September 4, 2025 4:31 PM
Maratha Reservation
---Advertisement---

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या संघर्षात एक नवा वळण आलं आहे. 58 लाख कुणबी नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC Reservation)  मिळवून द्यावं अशी मागणी करण्यात आली होती. पण या संदर्भात आता सरकारकडे अशा नोंदींची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचा दावा समोर आला आहे. यामुळे आंदोलकांना मोठा धक्का बसला आहे.

शिंदे समितीचा दावा व मराठ्यांचा विश्वास :

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने याआधी सांगितले होते की, राज्यात तब्बल 58 लाख कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. यावर आधारित मागील दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने आंदोलन केले आणि मराठा समाजाच्या मोठ्या वर्गाने हा दावा सत्य मानला.

शिंदे समितीच्या अहवालानंतर 10 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे देखील जाहीर करण्यात आली. त्यामुळे मराठा समाजात “आर्धा समाज आधीपासूनच कुणबी आहे” असा ठाम विश्वास बसला आणि आंदोलनाला अधिक उर्जा मिळाली.  (Maratha Reservation)

Maratha Reservation | ॲड. योगेश केदार यांचा खळबळजनक दावा :

मुंबईतील चर्चेत सहभागी असलेले ॲड. योगेश केदार यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्यानुसार, दोन दिवसांपासून ते सरकारकडे 58 लाख कुणबी नोंदींबाबत माहिती मागत आहेत. परंतु सरकारकडे अशा प्रकारची अधिकृत आकडेवारी उपलब्धच नाही, असे उत्तर मिळाले आहे. मग इतके दिवस “58 लाख नोंदी सापडल्या” असे सांगितले जात होते, ते खोटं होतं का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या दाव्यामुळे आंदोलकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर खरंच सरकारकडे आकडेवारीच उपलब्ध नसेल, तर आंदोलकांची फसवणूक झाल्याचा आरोप टाळता येणार नाही. तसेच ॲड. केदार म्हणतात, “आपली लढाई भावनिकतेतून नव्हे, तर संविधानिक मार्गाने व्हायला हवी. समाजाला चुकीच्या माहितीच्या आधारावर दिशाभूल करणं योग्य नाही.”

News Title: Maratha Reservation Twist: Govt Denies Having Data on 58 Lakh Kunbi Records | Advocate Yogesh Kedar’s Big Claim

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now