Chhagan Bhujbal | राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून जीआर काढल्यानंतर ओबीसी आणि मराठा समाज आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला थेट प्रश्न विचारला आहे.
भुजबळांचा सवाल :
हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले. ते म्हणाले, “तुम्हाला दिलेलं स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नकोय का? ते रद्द करायचं का? आणि जर ते रद्द झालं, तर ईडब्ल्यूएसमधलं आरक्षणही नको का?”
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री आहेत, आमदार-खासदार आहेत. ते शिकलेले, जाणकार आहेत, त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. पण ज्यांना काही माहिती नाही, अशिक्षित आहेत, त्यांच्याकडून उत्तर नको.”
Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर :
छगन भुजबळ यांच्या विधानाला मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी थेट प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “मी अशिक्षित असो वा शिक्षित, पण तुम्हाला रडकुंडीला आणलं ना! तुमचा उद्देश होता मराठा समाजाला आरक्षण मिळू न देणं, पण त्यावर पाणी फेरलं. आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही आरक्षणात गेले.”
या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “सरकारने काढलेला जीआर हा कायद्याच्या चौकटीत आहे. त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही.”






