मराठा आरक्षणाच्या मोर्चाला ‘या’ आमदार-खासदारांचा जाहीर पाठिंबा; यादी आली समोर

On: August 29, 2025 9:27 AM
Maratha Reservation
---Advertisement---

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनासाठी मराठा समाजाचे लाखो बांधव रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राजकीय नेत्यांकडूनही ठोस पाठींबा मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटातील आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने या आंदोलनाचे स्वरूप आणखी व्यापक होणार आहे.

सत्ताधारी नेत्यांचा पाठिंबा :

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षातील चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित आणि राजू नवघरे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) चे आमदार विलास भुमरे यांनीही आंदोलनाच्या समर्थनार्थ उभे राहत आपला पाठींबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे प्रकाश सोळंके हे प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्षातील दोन आमदार आणि तीन खासदारांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आमदार संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि आमदार कैलास पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ उभे राहत एकजूट दाखवली आहे. तर खासदार बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार गट), खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) आणि खासदार संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट) यांनी थेट पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर हे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. ( MLAs MPs Support

Maratha Reservation | आंदोलनाला वाढती गती :

या आंदोलनाला मिळणारा राजकीय पाठिंबा मराठा समाजातील एकजुटीचे प्रतीक मानला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आझाद मैदानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

विजयसिंह पंडित यांनी आपल्या मतदारसंघात मोठमोठे पोस्टर्स लावून आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केवळ समाजाच्या पातळीवर मर्यादित न राहता, राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे ठरत आहे.

News Title: Maratha Reservation: Full List of MLAs and MPs Supporting Manoj Jarange Patil’s Protest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now