7/12 असलेल्या सर्वांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र? आमदारांची विखे पाटलांकडे मागणी

On: August 30, 2025 3:28 PM
Maratha Reservation
---Advertisement---

Kunbi Certificate | मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आंदोलन पेटले आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange) मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. राज्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी त्यांना भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. काल दिवसभर झालेल्या भेटींनंतर आज बीड जिल्ह्यातील आमदारांनी मराठा आरक्षण उपसमितीकडे मोठी मागणी केली आहे.

सातबारा असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आमदारांची मागणी :

आज मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर बीडमधील आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस, विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांनी उपसमितीची भेट घेतली. त्यांनी सातबारा (7/12 उतारा) असणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे.

तसेच शेती असणाऱ्यांना थेट कुणबी समजून आरक्षणाचा लाभ द्यावा असा प्रस्ताव त्यांनी समितीसमोर ठेवला. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर राज्यातील हजारो मराठा बांधवांना याचा थेट फायदा होऊ शकतो. (Kunbi Certificate)

Kunbi Certificate | उपसमितीकडून सकारात्मक प्रतिसाद :

या मागणीवर उपसमितीकडून सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, दोन प्रतिनिधी आता मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार आहेत. आंदोलन लवकरात लवकर संपावे आणि सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही आमदारांनी केली. समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण शक्य आहे, तर महाराष्ट्रातही संविधानात बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल, तर आरक्षणाच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले.

News Title: Maratha Reservation Big Update: Demand to Grant Kunbi Certificate to All with 7/12 Land Records

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now