Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले. पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला आहे.
मराठा आंदोलक आक्रमक
मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाताना दिसत आहे. ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीवर ठाम आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी “मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, अशी घोषणाबाजी देखील केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडालेला आहे. मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे यांनी सर्वांना एकत्र भेटावं, असं आंदोलक म्हणाले. यावेळी राज ठाकरे सर्व कार्यकर्त्यांसमोर आले. त्यांनी भेटीसाठी परवानगी दिली. पण यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी आपल्यासोबत अरेरावीची भाषा केली, असा आरोप आंदोलकांनी केला.
Raj Thackeray मराठवाड्याच्या दौऱ्यावर
राज ठाकरेंच्या दौऱ्याला 4 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा सुरू असणार आहे. यामध्ये चार ऑगस्टला ते सोलापूर येथे होते सध्ये ते 5 ऑगस्ट रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. 6 ऑगस्ट ला ते लातूरला, तर सात ऑगस्टला ते नांदेडला, तर 8 ऑगस्टला ते हिंगोलीला, 9 ऑगस्ट ला ते परभणीला, 10 ऑगस्टला ते बीडला, 11 ऑगस्टला ते जालन्याला, 12 आणि 13 ऑगस्टला ते संभाजीनगरला असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
रॉयल एनफिल्डला टक्कर देणार BSA ची नवी बाईक; पाहा फीचर्स
“माझ्या नादाला लागू नको, फडणवीसांचं राजकीय करीअर..”; जरांगेंनी भाजप नेत्याला झापलं
‘या’ धक्कादायक कारणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळाल्या; दिला राजीनामा
दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल






