Satish Deshmukh Dies | मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईकडे रवाना झाले असतानाच जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत आंदोलकाचे नाव सतीश देशमुख असे असून, या घटनेमुळे मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
जरांगेंच्या आंदोलनापूर्वीच मृत्यू :
मनोज जरांगे पाटील यांनी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चा सुरू केला होता. आज सकाळी ते शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रयाण केले.
याचवेळी सतीश देशमुख यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने वातावरणात शोककळा पसरली आहे.
Satish Deshmukh Dies | आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी दिली आहे. जरांगे यांनी ही अट मान्य केली असली तरी शिवनेरीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले. त्यामुळे पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्याकडे “आंदोलनासाठी अटी-शर्ती काढून टाकाव्यात” अशी मागणी केली आहे.
जरांगे यांची भावनिक प्रतिक्रिया :
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “रायगड आणि शिवनेरीतून आम्हाला प्रेरणा मिळते. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यात साथ द्यायला हवी. न्यायालयाने परवानगी घ्या असं सांगितलं, त्यानुसार आम्ही केलं. पण एका दिवसाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाला परवानगी द्या.”






