गणेशभक्तांनो लक्ष द्या! मुंबईत मराठा मोर्चा, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; बाहेर पडण्याआधी ‘हा’ मार्ग तपासा

On: August 29, 2025 12:12 PM
Pune Traffic Alert
---Advertisement---

Maratha Morcha Traffic | मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षण मोर्चामुळे आज (२९ ऑगस्ट) मुंबईत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या लाखो मराठा बांधवांचा ताफा मुंबईत दाखल झाला असून, साडेसहा हजारांहून अधिक वाहनांनी शहरात प्रवेश केला आहे. यामुळे गणेशभक्त आणि चाकरमान्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

आझाद मैदानाकडे मराठा बांधवांचा ताफा :

रात्री उशिरा मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आणि त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे, मैदानाची क्षमता केवळ ५ हजार असली तरी तिथे २० हजारांहून अधिक आंदोलक दाखल झाले आहेत. यामुळे आझाद मैदान ते दादर परिसरापर्यंत वाहतुकीवर मोठा ताण आला आहे.

Maratha Morcha Traffic | बंद असलेले महत्त्वाचे मार्ग :

मुंबईतील महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ईस्टर्न फ्रीवे, सायन-पनवेल हायवे, पनवेल-सायन महामार्ग, व्ही. एन. पुर्व मार्ग, पी. डी. मेलो रस्ता, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नैरोजी मार्ग आणि हजारीमल सोमानी रस्ता यांचा समावेश आहे. हे मार्ग केवळ अत्यावश्यक कामांसाठीच वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.

पूर्णपणे बंद असलेले मार्ग :

– वाशी ते पांजरपोळ फ्री वे (South Bound)

– सायन पनवेल ते पांजरपोळ मार्ग

– सी. जी. गिडवाणी ते पांजरपोळ (North Route)

– आय. ओ. सी. जंक्शन व गोवंडी रेल्वे ब्रिजवरील फ्री वे

– देवनार फार्म ते पांजरपोळ मार्ग

– लोकलवरही परिणाम (Maratha Morcha Traffic)

विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा बांधव रेल्वेमार्गे मुंबईत दाखल होत आहेत. आंदोलक सीएसटीकडे धावणाऱ्या लोकलमधून प्रवास करत असल्याने लोकल सेवांवरही ताण येण्याची शक्यता आहे. दादर, सीएसटी आणि आझाद मैदान परिसरात प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

गणेशभक्तांनी काळजी घ्यावी :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे की, भक्तांनी योग्य मार्गांचा वापर करावा आणि बंद मार्गांकडे वळू नये. पर्यायी मार्गांचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळावी.

News Title: Maratha Morcha Traffic Chaos in Mumbai: Ganesh Devotees Advised to Use Alternate Routes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now