Beed l बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चर किती प्रमाणात फोफावलं आहे याचा दररोज उलगडा होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सुरू असलेलं गन कल्चर समोर आणताना परवानाधारक नसताना देखील बेधडकपणे बंदुकीचं उद्दातीकरण आणि दहशत करण्याच्या पद्धतीचा पर्दाफाश केला आहे.
बीडमध्ये नेमके शस्त्र परवाने किती? :
संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सुरु असलेल्या दहशतीचे पुरावे ट्विट केले आहेत. याशिवाय बीडमध्ये नेमके परवाने किती आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1872589445997949013
मात्र आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर बंदुकीचा सलाम दिला असे मला सांगण्यात आले आहे.” या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. यासोबत अजून काही ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1872459550038913162
Beed l बीड जिल्ह्यामध्ये ‘इतक्या’ जणांकडे शस्त्र परवाना :
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, परभणी व अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त परवाने दिल्याचे म्हटलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये देखील 1 हजार 281 जणांकडे शस्त्र परवाना असल्याची बाब त्यांनी उघडकीस आणली आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1872463644455530949
दरम्यान, शस्त्र परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना हा दिला जातो. तसेच त्यामागची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा बंदूक कमरेला लावून फिरत आहेत. मात्र त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
News Title : many people have weapons licenses in beed
महत्वाच्या बातम्या –
राज्यावर पावसाचं सावट! ‘या’ तारखेला अवकाळी पावसासह गारपीट होणार?
सतीश वाघ खून प्रकरणी पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!
RJ सिमरनच्या आत्महत्येबाबत मोठी अपडेट समोर!
संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक का नाही?; अजितदादांना राष्ट्रवादीच्याचं आमदाराचा सवाल
बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला






