‘थोडं थांबा…’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना गंभीर इशारा

On: June 11, 2024 1:05 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. याउलट महाविकास आघाडीच्या जास्त जागा लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले आहेत. जरांगेंमुळे महायुतीला महाराष्ट्रात लोकसभेला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो, असे समजू नका. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथेही आपले उमेदवार पडले आहेत, असा दावा केला आहे.

मराठा आरक्षणाच्या वादामुळे पडलो असं समजू नका- मनोज जरांगे

आपण मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलेले आहे. हे आरक्षण टिकणारे आहे. पण असे असतानाही काही मागण्या जर होत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे. असे समजायचे काही कारण नाही की हा जो वाद आहे त्यांच्यामुळे आम्ही पडलो, असं छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या वक्तव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो, असं समजू नका, या भुजबळांनी केलेल्या दाव्यावर थोडं थांबा कळेल तुम्हाला, असा इशारा मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.

Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती आता खालावत आहे.

गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“..बाबत उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे”; भाजपचा खोचक सल्ला

“गोड बोलून माझा काटा काढण्याचा..”; मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप

शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावूक, म्हणाले…

अजित ‘दादा’ धोक्यात!, शरद पवारांकडे पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची मोठी मागणी

अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now