Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वार सुरू आहेत. भाजप नेते प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यात काही दिवसांपुर्वी वाद-विवाद झाले होते. अशात जरांगे (Manoj Jarange)आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात देखील हे शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं चित्र दिसून येतंय.
मनोज जरांगे यांनी 20 जुलैपासून जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची घोषणा करत राज्य सरकारला आता 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे.
प्रवीण दरेकर vs मनोज जरांगे
पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका केली. “दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल”, असा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी टीका केली आहे.
तसंच “राज्य सरकारकडून कुणीच आलं नाही. सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले”, असंही मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील म्हणाले आहेत.
जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आपल्या अटक वॉरंट बद्दल त्यांनी गंभीर दावा केला आहे. “न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेल मध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठं अडकत नाही, म्हणून हा कट आहे.”, असा दावाच जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
“ईडीचे कित्येक वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचे नाव आहे. बाकीचे देव बाप्पा चांगले मग हे देव बाप्पा असे कसे?मला वॉरंट आले तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे”, असंही जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याने पुण्यात जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
News Title – Manoj Jarange target Pravin Darekar
महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेमध्ये मेगा भरती! 7 हजारांपेक्षाही अधिक पदे भरली जाणार, ‘असा’ करा अर्ज
बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण
“सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण..”; जरांगे पाटलांचा आता थेट PM मोदींवरच हल्लाबोल
“मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते”; फडणवीसांचं नाव घेत जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ






