निकालाबाबत मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा!

On: November 25, 2024 1:45 PM
manoj jarange
---Advertisement---

Manoj Jarange | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे स्पष्ट निकाल समोर आले असून महायुतील दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे.

जरांगेंचा खळबळजनक खुलासा

निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रियी दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी खळबळजनक खुलासा केलाय.

आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचं त्याला आणलं आहे, आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडलं पण आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे. आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

आमची जात आणि आमची लेकरं बाळ मोठं करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे. कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे, असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले.

सत्ता, सत्ता असते- मनोज जरांगे

सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video

‘मी कटाचा बळी ठरलो’; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

पराभव जिव्हारी लागला; काँग्रेसचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now