Manoj Jarange l मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण मिळावे या मागणीवर अद्यापही ठाम आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला वेळोवेळी अल्टिमेटम देत आहे. मात्र याप्रकरणावर ठोस असा निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
Manoj Jarange l असा असणार मनोज जरांगे पाटलांचा दौरा :
अशातच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्या दरम्यान आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे. तसेच आज रात्री मनोज जरांगे पाटील तुळजापूर येथे मुक्कामी असणार आहेत.
मनोज जरांगे पाटलांनी मराठवाडा दौरा केल्यानंतर आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर 7 ऑगस्ट सोलापूर येथे असणार आहेत. तसेच 8 ऑगस्टला जरांगे पाटील सांगलीमध्ये मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेणार आहेत, तर 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा, 11 ऑगस्ट पुणे, 12 ऑगस्टला अहमदनगर (आहिल्यानगर), तर 13 ऑगस्टla नाशिक येथे मनोज जरांगे पाटलांचा दौरा निश्चित असणार आहे.
News Title : Manoj Jarange Patil tour of West Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या-
बजाजची ‘ही’ बाईक एकदा चार्ज केल्यावर धावणार तब्बल 136 किमी; जाणून घ्या किंमत
विधानसभेपूर्वी महायुतीत खटके; ‘त्या’ जागेवरून वादाची ठिणगी?
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला सर्वात मोठा धक्का!
काँग्रेसने ‘या’ 5 आमदारांचा विधानसभेचा पत्ता केला कट; पाहा कोण आहेत?
काल रात्री पुण्यात घडली धक्कादायक घटना; पुणेकरांची उडाली झोप






