Manoj Jarange Patil | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजासाठी आंदोलन उपोषण करताना दिसत आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात जो भूमिका घेईल त्यावर मनोज जरांगे पाटील हल्लाबोल करताना दिसत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी “तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लग्न कर”, अशी टीका प्रसाद लाड यांच्यावर केली आहे.
मनोज जरांगे प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक
मनोज जरांगेंवर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस, असं म्हणत मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांना टोला लगावला आहे.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ठाण्यातील एसपीला प्रसाद लाड यांनी जाब विचारण्याबाबत सांगितलं. ते म्हणाले की, ठाण्याच्या पोलीस भरतीमध्ये तिथल्या एसपीने कुणबी सर्टिफिकेट असलेल्या 400 ते 500 मुलांना बाहेर काढलं. त्यांना ओपनमध्ये टाकलं. त्यावर प्रसाद ला़ड यांनी घडलेल्या प्रकरणावर जाब विचारला पाहिजे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
ओपनमध्ये जा नाहीतर रिजेक्टच करून टाकत असल्याचं एसपी धमकी दिली. मग कशाला प्रमाणपत्र दिलंय? असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. भंगार लोकं आयएएस अधिकारी झाले आहेत. भंगार लोकांना बाहेर काढलं गेलं आहे. तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर, असा टोला मनोज जरांगेंनी लगावला आहे.
तसेच त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुलींच्या शिक्षणावर देखील भाष्य केलं आहे. मुलींना मोफत शिक्षण लागू केलं तेव्हा कशाला असल्या अटी लागू केल्या आहेत? असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे. मोफत शिक्षणाची घोषणा केली तर ते विनाअट करा ना, त्यासाठी व्हॅलिडिटी कशाला हवी आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
शांतता रॅलीला एकत्र येण्यासाठी मनोज जरांगेंचं आवाहन
मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅली करत आहेत. याला आता मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. आता ते पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. 7 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरूवात होईल. तेव्हा मनोज जरांगे पाटील हे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक दौऱ्यावर आहेत. यासाठी मनोज जरांगेंनी आपल्या जातीसाठी सर्व काम, लग्नकार्य सोडून उपस्थिती दाखवण्यास सांगितली आहे.
News Title – Manoj Jarange Patil Slam To Prasad Lad On Maratha Reservation Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“जगलोच तर ॲब्यूलन्समध्ये जाईन पण…”; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
“येणाऱ्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजनाही येतील”; कॉँग्रेसचा टोला
मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; ‘या’ 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू
पुणे हादरलं! सासवडमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ
अभिनेत्री जान्हवी कपूरला झाली विषबाधा?, रुग्णालयात उपचार सुरू






