Manoj Jarange | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील उपोषणानंतर सरकारला आरक्षणाविषयी निर्णय घेण्यास भाग पाडले. राज्य सरकारने मराठा समाजासाठी जीआर काढला असला तरी, त्यावर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आपला ठाम दावा मांडत “आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आलाय” असे वक्तव्य केले आहे.
“आमचा हक्क आम्ही मिळवला” :
जरांगे यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाचा हक्क आता मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, “माझ्या पोरांनी करोडोंनी मुंबईत हजेरी लावली आणि विजय घेऊन आले. हा विजय आमचा आहे. जीआर म्हणजे आमच्या संघर्षाचं लिखित उत्तर आहे. मराठे हे आरक्षणासाठी आधीपासून लढत आले आहेत. आम्ही आधीपासून आरक्षणात होतो, आता फक्त त्याची अंमलबजावणी होत आहे.” (Manoj Jarange Statement )
त्यांनी इतर मराठा नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की, “ते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाही. मात्र, मी माझा समाजाचा हक्क मिळवून दिला आहे.”
Manoj Jarange | “ओबीसी आमच्यात आले आहेत” :
जरांगे यांनी पुढे ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्यावर टीका केली. “भुजबळांना जीआर चांगला कळतो. त्यांनी मोठमोठे पक्ष हाताळले आहेत, सत्ता सांभाळली आहे, त्यामुळे जीआरचा अभ्यास त्यांना चांगला आहे. पण सत्य हेच आहे की आम्ही ओबीसीत गेलेलो नाही, उलट ओबीसी आमच्यात आलाय,” असे जरांगे म्हणाले.
त्यांनी पुढे इतिहासाचा दाखला देत सांगितले की, “१८८१ पासून आम्ही आरक्षणात होतो. आमचे पूर्वज मोठ्या मनाचे होते. आता काळ बदलला आहे. समाज प्रगतीकडे न्यायचा असेल तर आरक्षण गरजेचं आहे. ते आम्ही टप्प्याटप्प्याने मिळवलं आहे.”
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी नेते आणि समाजात असंतोष वाढताना दिसत आहे. सरकारने यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती देखील नेमली आहे. मात्र, जरांगे यांच्या वक्तव्यामुळे आता मराठा आणि ओबीसी समाजात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
News title : Manoj Jarange Patil on Maratha Reservation | “We Didn’t Go into OBC, OBC Came Into Us” | Big Political Claim






