Manoj Jarange Patil | सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं आता चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तासानंतर सुरूवात होणार आहे. यामध्ये बीड आणि जालन्याकडे मनोज जरांगे यांचं लक्ष राहणार आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विराट सभा घेतली. तसेच त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
8 जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेत असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत. त्यासाठी आधी 15 मे रोजी मी जागा पाहण्यासाठी जाणार आहे. सर्वच मराठा बांधवांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करत असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत. याठिकाणी सहा कोटी मराठा बांधव सभेला उपस्थित राहणार आहेत. 15 मे नंतर पाहणी करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी बोलत असताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
“चंद्रकांत पाटील तेरे नाम भांग पाडून आले”
चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का?, असा सवाल त्यांनी केला. त्यांना त्यातलं काय कळतं. फक्त तेरे नाम भांग पाडून आले आहेत. त्यांची स्वत:ची 37 मतं देखील पडतील का?, असा उपरोधिक सवाल करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य केलं.
“पंकजा मुंडेंनी जातीयवाद निर्माण होणारं वक्तव्य केलं”
पंकजा मुंडे यांनी जातीयवाद निर्माण होणारं वक्तव्य केल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. भरसभेत ओबीसींनी एक होण्याची गरज असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यावेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणं गरजेचं होतं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावं की, एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला सांगितला होता. मी नाव घेणं बंद करेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमच्यावरील गुन्हे आणि एसआयटी कोणी दाखल केली, याबाबत मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले.
प्रमाणपत्र दिलं गेलं असूनही ते प्रमाणपत्र नका देऊ, असे आदेश फडणवीस यांनी दिले तुम्ही असं का करत आहात?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आम्ही भाजपविरोधात कधीच नव्हतो. जर असतो तर 106 आमदार निवडून आले नसते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil On BJP Leader Chandrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ खडसेंची सर्वात मोठी घोषणा!
गुड न्यूज! ‘या’ चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज
नवव्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तोंड उघडलं, सगळं खरं खरं सांगून टाकलं
बीडमध्ये कोण निवडून येणार?; मनोज जरांगेंचं भाकीत
क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत






