मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेटियर संदर्भात सर्वात मोठा धक्का!

On: September 11, 2025 9:28 AM
Kunbi Certificate
---Advertisement---

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या चळवळीला चालना देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazette PIL) आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे अधिसूचना काढली होती. पण या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा मार्ग सुकर होण्याऐवजी न्यायालयीन अडथळे उभे राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

हैदराबाद गॅझेटियरविरोधात लोकहित याचिका :

या अधिसूचनेविरोधात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकांमध्ये ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच याचिका प्रलंबित असताना या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र कोणालाही देऊ नये, अशीही अंतरिम विनंती करण्यात आली आहे. (Maratha Reservation)

यासंदर्भात एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे ॲड. सतीश तळेकर यांनी दाखल केली आहे, तर दुसरी याचिका वकील विनीत धोत्रे यांनी सादर केली आहे. या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maratha Reservation | गावपातळीवर समित्या गठीत :

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्यात येत आहेत. या समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. प्रमाणपत्रासाठी अर्जदारांनी मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन शेतकरी किंवा बटाईदार म्हणून जमीन शेती करत असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे. (Hyderabad Gazette PIL)

कुणबी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी अर्जदारांनी वडील व आजोबा हे गावचे रहिवासी असल्याचे दाखले, तसेच स्थानिक जेष्ठ नागरिक व पोलिस पाटील यांची माहिती यांचा आधार घ्यावा लागणार आहे. अंतिम पडताळणी तहसील स्तरावरील समितीकडून केली जाणार असून, यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मंजूर होईल. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

News title : Manoj Jarange Patil Big Setback | Hyderabad Gazette PIL in Bombay High Court

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now