‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट

On: March 21, 2024 2:57 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange | महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूकीचं वारं वाहू लागल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावागावत जाऊन आंदोलन आणि जाहीर सभा घेणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. मात्र जरांगेंच्या पार पडलेल्या सभेत त्यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाही तर जरांगेंनी फडणवीसांबाबत मोठा खुलासा केला आहे.

जरांगेंनी केला खुलासा-

माध्यमांशी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला पहाटे तीन वाजता फोन केला होता. एवढंच नाही तर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच, असं मनोज जरांगेंनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या वेळी जरांगेंनी पालक मंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला. जरांगे म्हणाले की, पालकमंत्री आणि गृहमंत्री यांचा एकच विचार आहे का? त्यामुळेच मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माझ्यावर घरावर नोटीस-

पुढे जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, पालकंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालक आहेत, म्हणूनच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत तर आम्ही त्याच्यासोबत भांडणार आहोत. तसेच गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटीसा लावल्या जात आहेत, असं देखील जरांगे पाटील म्हणालेत. मराठा समाजाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. पण ते चुकीच्या माणसाला भेटले असून, मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी.

“मला बदनाम केलं”

बीड येथे सभा स्थळी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मराठा बांधवांपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडीओ काढायला सुरुवात केली आहे.

News Title : manoj jarange on devendra fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र

डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार

‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now