छत्रपती संभाजीनगमध्ये मोठी घडामोड; मनोज जरांगेंची ताकद वाढली

On: October 20, 2024 11:39 AM
Manoj Jarange challenge to state government
---Advertisement---

Sambhaji Nagar | राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. जरांगे (Manoj Jarange) फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठा बदल झाल्याचं दिसलं. आता येत्या विधानसभेला देखील जरांगे त्यांची ताकद दाखवतील, अशी चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठकांचा आणि भेटीचा धडाका लावला आहे. जरांगेंनी नुकतीच संभाजीनगरमध्ये घेतलेली एक भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

छत्रपती संभाजीनगमध्ये मोठी घडामोड

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली. सज्जाद नोमानी भारतीय इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीआधी जरांगेंची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. कारण सज्जाद नौमानी यांनी मुस्लीम समाजाला जरांगेंनी उभं केलेल्या उमेदवाराला किंवा जरांगेंच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Manoj Jarange यांची ताकद वाढली

नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जेष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक वाटलं म्हणून मी त्यांचा मार्गदर्शन घेतलं, असं जरांगे पाटील म्हणाले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो तिथे जात लावून चालत नाही. न्याय खेचून आणायचा आहे त्यामुळे मानवतावाद जागा ठेवणं महत्त्वाचं आहे. नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं प्रचंड मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकतं, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

ते प्रचंड आजारी आहेत त्यांना आंतरवाली मध्ये येता येत नव्हतं त्यांची धडपड होती मात्र त्यांना येता आलं नाही त्यामुळे मी इथपर्यंत आलो एक-दोन दिवस चर्चा होऊन पुढचा निर्णय होईल माणुसकीच्या नात्याने आम्ही भेट घेतली आहे त्यांना अन्यायाची चीड आहे समाजाचा आणि गोर गरीबांचा मान सन्मान वाढवणं गरजेचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे आणि मराठा समाज बांधव विधानसभा लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाविकास आघाडीचा महायुतीवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?

‘आता सुट्टी नाही’; यादी जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याची मोठी घोषणा!

“मतदारांना बाहेरून आणण्यासाठी ‘फोन पे’ करा”; शिंदेसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now