Manoj Jarange Health Update | मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत उपोषण करणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अखेर मोठा विजय मिळाला आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. परंतु, सलग अनेक दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (maratha reservation)
डॉक्टरांचा सल्ला :
रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आला आहे. शरीरातील ताकद कमी झाली असून आवश्यक पोषक तत्त्वेही घटली आहेत. त्यामुळे सध्या त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढील दोन आठवड्यांत त्यांनी कोणताही प्रवास किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी तज्ज्ञ टीम सतत लक्ष ठेवून आहे. (Manoj Jarange Health Update)
डॉक्टरांच्या पथकाने रात्री उशिरा त्यांची संपूर्ण तपासणी केली. दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर, रक्तदाब तसेच पोषणतत्वांची पातळी तपासण्यात आली. या सर्व तपासण्यांनंतर डॉक्टरांनी त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना पुढील पंधरा दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Manoj Jarange Health Update | समाजाचा दिलासा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या आंदोलनाकडे लागले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने समाजामध्ये चिंता होती. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतल्याने मराठा समाज आणि सरकार दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार टिकणारे आरक्षण मिळणार असून याचा थेट फायदा गरीब आणि गरजू मराठा समाजाला होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या त्यागाचे आणि संघर्षाचे कौतुक होत आहे.






