जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”

On: November 4, 2024 10:32 AM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच रविवारी सर्वात मोठा निर्णय घेत आपली राजकीय भूमिका जाहीर केली होती. कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत त्यांनी निर्णय घेतला होता.जरांगे यांनी निवडणुकीत उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं. (Manoj Jarange )

मात्र, आज 4 नोव्हेंबररोजी त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. काल रात्री निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करत आज सकाळी त्यांनी माघार घेतली आहे. एका रात्रीत नेमकं असं काय घडलं की जरांगे यांना माघार घ्यावी लागली, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी माघार घेण्यामागील कारणही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

“आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. पण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य होणार नाही. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल, त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतलाय.”,असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असं आवाहन जरांगे (Manoj Jarange )यांनी केलंय.

“राजकीय प्रक्रिया हाताळणं सोपं नाही”

“मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही. समाजाला एक सांगणं आहे, तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही.”, असं जरांगे (Manoj Jarange )म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय गणित बदलणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच जरांगे यांनी निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले होते. यासाठी त्यांनी काल घोषणा देखील केली होती. मात्र, सकाळी त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title – Manoj Jarange gave the reason for withdrawal

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, अचानक का घेतला निर्णय?

दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?

सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अजितदादांच्या उमेदवारांना शिंदेंकडूनच आव्हान; आता दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल

“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी

Join WhatsApp Group

Join Now