भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

On: August 29, 2024 5:36 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange l गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला वेढीस धरल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. अशातच आता मराठवाड्यातील भाजप नेत्याला सुद्धा त्यांनी थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगेच्या इशाऱ्यामुळे मराठवाड्यातील चिंता वाढली :

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यातील चिंता वाढली आहे. कारण रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली आहे. मी रावसाहेब दानवेंना आतापर्यंत दादा म्हणत होतो. मी नेहमी त्यांचा आदर करत आहे. मात्र त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आत्ता केली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी रावसाहेब दानवेंना थेट इशाराही दिला आहे.

येत्या विधानसभेला तुमचं कोणी तरी उभं राहील ना मग दाखवतो कचका. त्यामुळे कर कुणालाही उभं, असं इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी आणि विषय लांबवू नये. तसेच नागपूरची देखील सीट पण पडत असते, याशिवाय मला जेल मध्ये टाकले तर पोर हनुमान सारखे जेल उचलून आणतील. तर मी भोकरदनमध्ये देखील ऑफिस उघडतो असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

Manoj Jarange l कचका काय असतो ते दाखवतो : मनोज जरांगे पाटील

भोकरदन या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे निवडून आले आहेत. मात्र आता तुम्हाला देशोधडीला लावतो. रावसाहेब दानवे यांनी माझ्या नादाला लागु नये. तसेच माझ्यावर केस करायला लावली, आता तुझे कोणी उभे राहिले ना दाखवतो कचका काय असतो असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगेच्या या इशाऱ्यामुळे भोकरदन मतदारसंघात देखील टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार याकडे संपूर्ण राज्यच लक्ष असणार आहे.

News Title : Manoj Jarange Aginst On Raosaheb Danve

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील ‘या’ भागात एटीएसची मोठी कारवाई! थेट दहशतवाद्यांशी संबंध…?

भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार; कोणती भूमिका साकारणार?

मधुमेहाच्या रुग्णांनो ‘ही’ गोष्ट करा आणि झटक्यात मधुमेहापासून सुटका मिळवा

बाप्पाच्या आगमनाला 9 दिवस बाकी! ‘या’ 4 गोष्टी चुकूनही विसरू नका!

अजा एकादशीच्या दिवशी ‘हे’ काम करा; विष्णूच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now