Manohar Joshi | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक पसरला. राज्यभरातील नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोशी सरांना श्रद्धांजली वाहत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जुनी आठवण सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं, असे यावेळी ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं.
राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
तसेच मनोहर जोशी पुढे लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत राज यांनी जोशींना श्रद्धांजली वाहिली.
मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.
शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर… pic.twitter.com/ti8v3tJWzl— Raj Thackeray (@RajThackeray) February 23, 2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील मनोज जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, शून्यातून विश्व निर्माण करणारे… कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले… मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन.
Manohar Joshi यांचे निधन
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोशी यांच्यासाठी लांबलचक पोस्ट लिहिली. “माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉ. मनोहर जोशी यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केले. अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण जोशी कुटुंबीयांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली”, असे त्यांनी नमूद केले.
माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्व बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉ मनोहर जोशी यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केले. अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण हि… pic.twitter.com/1QPLhW4qJ8
— Supriya Sule (@supriya_sule) February 23, 2024
दरम्यान, मनोहर जोशी यांनी आज पहाटे 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ठेवणण्यात येणार असल्याचे कळते.
News Title- Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi passes away, Raj Thackeray, Supriya Sule and Sanjay Raut pay tribute
महत्त्वाच्या बातम्या –
शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू
पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव
मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण
प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास






