Mangal Gochar 2025 | वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा ग्रहमानात मोठा बदल होत असून मंगळ ग्रहाचे आगामी संक्रमण काही राशींना आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मंगळ वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार असून, त्याचा प्रभाव पुढील 40 दिवस राहणार आहे. हा काळ 16 जानेवारी 2026 पर्यंत कायम राहणार असून त्याचा थेट परिणाम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही होणार आहे. (Mangal Gochar 2025)
मंगळ ग्रहाला ऊर्जेचा, आक्रमकतेचा आणि संघर्षाचा ग्रह मानले जाते. त्यामुळे मंगळाचे धनु राशीत होणारे संक्रमण काही राशींसाठी तणाव, खर्चवाढ आणि वादविवाद वाढवणारे ठरू शकते. यामुळे अनेक गोष्टींमध्ये अचानक बदल जाणवू शकतात. ज्योतिष अभ्यासकांच्या मते या बदलाचा प्रभाव विशेषतः वृषभ, कन्या आणि मकर राशींवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे.
वृषभ आणि कन्या राशींना वाढत्या ताणाचा इशारा :
मंगळ ग्रह वृषभ राशीच्या आठव्या चरणात प्रवेश करणार असल्याने या राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरणार आहे. मुलांशी संबंधित काही अडचणी अचानकपणे समोर येण्याची शक्यता असून घरगुती वातावरणात तणाव वाढण्याची भीती आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागणे आवश्यक आहे. व्यवसायिक निर्णयांमध्ये सावधानता पाळली नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे हे संक्रमण चौथ्या चरणात होत असल्याने घरगुती वादविवाद वाढण्याची शक्यता अधोरेखित केली जाते. करिअरमध्ये अनिश्चितता आणि उतार-चढाव वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेणे गरजेचे असून मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून खर्च वाढण्याची शक्यता असल्याने कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करणे योग्य ठरेल.
Mangal Gochar 2025 | मकर राशीला अचानक संकटांचा वेध :
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे बाराव्या चरणातील संक्रमण आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. पार्टनरसोबत अनावश्यक वाद किंवा गैरसमज निर्माण होण्याची भीती आहे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांचा दबाव वाढू शकतो, त्यामुळे शांत राहून निर्णय घेणे आवश्यक आहे. (Mangal Gochar 2025)
आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला कमजोर वाटण्याची शक्यता असल्याने विश्रांती आणि योग्य दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक या काळात टाळण्याचा सल्ला दिला जातो. अचानक आर्थिक ताण वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरेल.






