Astrology | 2026 हे नववर्ष अनेकांसाठी शुभफलदायक तर काहींसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज ज्योतिषांनी व्यक्त केला आहे. कारण या वर्षाच्या सुरूवातीलाच ग्रहांचा महत्त्वाचा संयोग तयार होत आहे. त्यात सर्वाधिक लक्षवेधी म्हणजे मंगळ ग्रहाचा अस्त, जो 6 नोव्हेंबर 2025 रोजी झाला असून 2026 च्या पहिल्या चार महिन्यांपर्यंत अस्त राहणार आहे. या काळात 5 राशींना विशेषतः सावध राहावे लागणार असल्याचा इशारा ज्योतिषांनी दिला आहे.
मंगळ हा शक्ती, आत्मविश्वास, उत्साह आणि साहसाचा अधिपती ग्रह मानला जातो. मात्र, कोणत्याही ग्रहाचा अस्त झाल्यावर त्याची प्रभावशक्ती कमी होते आणि अशुभ परिणाम वाढतात. त्यामुळे या काळात काही राशींच्या जातकांना नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि संबंधांमध्ये ताण जाणवू शकतो.
मंगळाचा अस्त कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक? :
१. मिथुन (Gemini):
या राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रगतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. अनेक प्रयत्नांनंतरही अपेक्षित फळ मिळणार नाही. व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी. पती-पत्नीमधील संबंधात तणाव येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखा.
२. सिंह (Leo):
मंगळाचा अस्त सिंह राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि आर्थिक आव्हानं घेऊन येणार आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो. दिखाव्याच्या गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. वाद-विवाद टाळा आणि निर्णय शांतपणे घ्या.
३. वृश्चिक (Scorpio):
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळच असल्याने या राशीवर परिणाम अधिक जाणवेल. प्रगतीत अडथळे येतील, कामातील मनःशांती हरवू शकते. अनावश्यक खर्च वाढतील. पाठदुखी किंवा शारीरिक थकवा जाणवू शकतो. राग आणि चिडचिड टाळा.
Astrology | मीन आणि कुंभ राशींनाही भोगावे लागणार परिणाम :
४. मीन (Pisces):
या राशीच्या जातकांसाठी मंगळाचा अस्त वाद निर्माण करणारा ठरू शकतो. जुने वाद पुन्हा उफाळू शकतात. कुटुंबात मतभेद वाढतील. व्यवसायातही अडचणी येऊ शकतात. आत्मसंयम ठेवा आणि निर्णयात घाई करू नका.
५. कुंभ (Aquarius):
कुंभ राशीतील व्यक्तींना आरोग्य आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामातील अडथळ्यांमुळे मनात चिडचिड वाढेल. आर्थिक नियोजनात शिस्त ठेवणे गरजेचे आहे. ध्यान आणि साधना करून मन शांत ठेवा.






