PM Modi Threat | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटण्यातील विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून मोदींना ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज पोलिसांना प्राप्त झाला. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. तपासात आढळले की, हा मेसेज पंतप्रधानांवर नाही तर एका कौटुंबिक वादातून पाठवण्यात आला होता. (PM Modi Threat)
जमिनीच्या वादातून काकांवर सूड :
धमकीचा मेसेज भागलपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. हा मेसेज सुल्तानगंज महेशी गावातील मंटू चौधरी यांच्या मोबाईलवरून पाठवण्यात आला होता. मात्र, चौकशीत मंटू चौधरी यांचा यामध्ये काहीही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. खरेतर, हा मेसेज त्यांचा पुतण्या समीरकुमार रंजन याने पाठवला होता.
समीरकुमारचा आपल्या काकांशी जमिनीवरून वाद सुरु होता. या वैयक्तिक दुश्मनीतून काकांना अडचणीत आणण्यासाठी आणि फसवण्यासाठी त्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची बनावट धमकी दिली होती.
PM Modi Threat | VPN आणि फिंगरप्रिंटचा वापर करून फसवणूक :
समीरकुमारने पोलिस अधिकाऱ्यांसह भागलपूर एसपींना देखील हा मेसेज पाठवला होता. त्याने फसवणूक करताना VPN प्रणालीचा वापर केला आणि आपल्या काकांचा मोबाईल फिंगरप्रिंटने अनलॉक करून त्यावरूनच मेसेज पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून सखोल चौकशी सुरू आहे. (PM Modi Threat)
सुरक्षा यंत्रणांनी यावेळी अतिशय तात्काळ आणि योग्य प्रतिसाद दिला. तथापि, वैयक्तिक वादासाठी देशाच्या पंतप्रधानांना लक्ष्य करणारी बनावट धमकी देणे हे गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य मानले जात आहे.






