‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा

On: December 7, 2024 6:27 PM
mamata kulkarni
---Advertisement---

Mamta Kulkarni | 90 चं दशक गाजवणारी बाॅलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. करण-अर्जून, नसीब, क्रांतीवीर या हिंदी चित्रपटात ममताने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. आज सुद्धा ममताच्या सिनेमांची क्रेझ आहे. आता जरी ममता तिच्या प्रोफशनल लाईफमुळे चर्चेत नसली तरी, ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ममताने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

25 वर्षांनी मायदेशी-

सोशल मीडियावर ममता (Mamta Kulkarni) कायम सक्रिय असते. ती नेहमीच नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. अशातच ममताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत भारतात आल्याची माहिती दिली आहे. 25 वर्षांनंतर मी माझ्या मायदेशी परतले आहे. पोस्ट शेअर करताना ममता अतिशय इमोशनल झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, ममताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.

अंडरवर्ल्डसोबत लग्नगाठ?

ममताने (Mamta Kulkarni) तिच्या रिलेशनशिबद्दल खुलासा केला आहे. बोलत असताना ममता म्हणाली की, अद्यापही मी सिंगल आहे. मी विक्की गोस्वामी सोबत लग्न केलं नाही. तो माझा पती नाहीये. आज देखील मी सिंगल आहे. मी कोणासोबतच लग्न केलेलं नाही. विक्की आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो. पण मी त्याला 4 वर्षांपूर्वी ब्लॉक केलं आहे.

पुढे ती म्हणाली की, विक्की चांगला व्यक्ती आहे. त्याचं मन देखील चांगलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमधून अनेक सेलिब्रिटी त्याला भेटण्यासाठी यायचे. पण विक्कीला भेटणारी मी चित्रपटसृष्टीतील शेवटची व्यक्ती होती. जेव्हा मला त्याचं सत्य कळलं तेव्हा मी त्याला सोडलं. तो दुबईच्या तुरुंगात होता. मी त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केले.

2012 मध्ये विक्की याची तुरुंगातून सुटका झाली आणि मी त्याला 2016 मध्ये भेटली. त्यानंतर पुन्हा त्याला अटक करण्यात आली. आता विक्की माझा भूतकाळ आहे आणि मी त्याला केव्हाच सोडलं आहे, असं ममता म्हणाली.

News Title : Mamta Kulkarni reveals about her past

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून मविआच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं?

बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई

थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now