दाऊद इब्राहिमबाबत ममता कुलकर्णीचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली….

On: October 30, 2025 1:34 PM
Mamata Kulkarni
---Advertisement---

Mamata Kulkarni | नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni) पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा दहशतवादी नसून, त्याला षडयंत्राखाली बदनाम करण्यात आले आहे, असे खळबळजनक विधान तिने केले आहे.

“दाऊदला भेटले नाही, तो दहशतवादी नाही” :

अनेक वर्षांनंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या ममता कुलकर्णीने (Mamata Kulkarni) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल (Dawood Ibrahim) बोलताना धक्कादायक विधाने केली. ती म्हणाली, “दाऊद हा दहशतवादी नाही आणि बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही घटनेत त्याचे नाव कधी आले नाही. मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी षडयंत्र रचून त्याला बदनाम केले आहे.”

तिने पुढे स्पष्ट केले की, केवळ प्रचार केल्याने कोणी गुन्हेगार होत नाही, त्यासाठी आरोप सिद्ध व्हावे लागतात. “दाऊदशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. मी आयुष्यात त्याला कधीही भेटले नाही,” असेही तिने म्हटले.

Mamata Kulkarni | छोटा राजन आणि ‘चायना गेट’ वाद :

ममता कुलकर्णीचे (Mamata Kulkarni) नाव यापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत (Chhota Rajan) जोडले गेले होते. १९९८ मध्ये त्यांच्यातील कथित संबंधांच्या अफवा पसरल्या होत्या. ‘चायना गेट’ (China Gate) चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, छोटा राजनकडून कथित धमकी मिळाल्यानंतर तिला चित्रपटात परत घेण्यात आले.

यावर बोलताना ममताने दाऊदचा थेट उल्लेख न करता म्हटले की, “माझे नाव एका व्यक्तीसोबत जरूर जोडले गेले होते. पण तुम्ही बघा, त्याने कोणताही बॉम्बस्फोट केला नाही. देशात देशविरोधी काही केले नव्हते.”

२५ वर्षांनंतर भारतात पुनरागमन :

‘कभी तुम कभी हम’ (Kabhie Tum Kabhie Hum) (२००२) या चित्रपटात शेवटची दिसलेली ममता कुलकर्णी २००० कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांमुळे आणि ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबतच्या (Vicky Goswami) संबंधांमुळे देश सोडून गेली होती. या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर ती २५ वर्षांनी २०२४ च्या अखेरीस भारतात परतली आहे.

News title : Mamata Kulkarni Defends Dawood Ibrahim

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now